📢 "ई-बॉन्डची महाराष्ट्रात आजपासून सुरुवात: काय आहे हा बदल आणि तो आपल्यासाठी
महाराष्ट्र सरकारने आजपासून (दि. ३ ऑक्टोबर) एक ऐतिहासिक निर्णय घेतला असून, राज्यात ई-बॉण्ड प्रणालीची (E-Bond System) अधिकृतपणे सुरुवात झाली आहे.
आता स्टॅम्प पेपरच्या गरजेशिवाय व्यवहार शक्य होणार असून, ही यंत्रणा डिजिटल इंडियाला आणि Ease of Doing Business उपक्रमाला बळकटी देणारी ठरणार आहे.
राज्यात प्रथमच मुद्रांक विभागामार्फत इलेक्ट्रॉनिक बॉण्ड लागू करण्यात आला असून, हे एक क्रांतिकारी पाऊल मानले जात आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
ई-बॉण्ड म्हणजे नेमकं काय?
ई-बॉण्ड ही एक इलेक्ट्रॉनिक स्टॅम्प प्रणाली आहे जिच्या माध्यमातून आता विविध आयात/निर्यात व्यवहार पूर्णपणे डिजिटलरित्या करता येणार आहेत. यासाठी कागदी स्टॅम्प पेपरची आवश्यकता उरणार नाही.
✅ ई-बॉण्डचे मुख्य फायदे:
1. कागदविरहित व्यवहार:
कागदी स्टॅम्पपेपरची गरज संपुष्टात.
पर्यावरण पूरक प्रणाली – ग्रीन गव्हर्नन्सकडे मोठे पाऊल.
2. पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया:
आयातदार व निर्यातदार ICEGATE पोर्टलवरून ई-बॉण्ड तयार करू शकतात.
NeSL द्वारे ई-स्टॅम्पिंग आणि आधारआधारित ई-स्वाक्षरी.
सर्व शुल्कांचे ऑनलाईन पेमेंट.
3. सुरक्षितता आणि पारदर्शकता:
दोन्ही पक्षांच्या ई-स्वाक्षरीमुळे फसवणुकीला आळा.
कस्टम अधिकाऱ्यांकडून रिअल टाईम पडताळणी.
4. वेळ आणि खर्च वाचवणारी प्रणाली:
वेगवान प्रक्रिया.
व्यवसाय करणे अधिक सोपे आणि गतिमान.
कोणाला होणार फायदा?
आयातदार व निर्यातदार
लॉजिस्टिक कंपन्या
वेअरहाऊसिंग व उत्पादन उद्योग
सरकारी यंत्रणा (सीमाशुल्क अधिकारी, स्टॅम्प विभाग
इ.) हे बॉण्ड कुठे वापरता येणार?
Provisional Assessments
Export Promotion Schemes
Warehousing
Manufacturing in Bonded Warehouses
टिप्पणी पोस्ट करा