जून जुलै 2025 दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होईल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व फोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते दिनांक ०८ जुलै, २०२५ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) ची पुरवणी परीक्षा दिनांक २४ जून, २०२५ ते १६ जुलै, २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती.

सदर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येत असून निकालाची कार्यपध्दती व त्याच्या कार्यवाहीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत जून-जुलै २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्व माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल पुढील संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक २९/०७/२०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता जाहीर करण्यात येत आहे.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) परीक्षा

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा

https://www.mahahsscboard.in

https://www.mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

http://sscresult.mkcl.org

२) ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (३.१२ वी) पुरवणी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) फोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने https://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना स्वतः अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक ३०/०७/२०२५ ते शुक्रवार, दिनांक ०८/०८/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोजतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क (Debit Card/ Credit Card/UPI/Net Banking) याद्वारे भरता येईल.

३) जून-जुलै २०२५ पुरवणी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्‌तीचा अवलंब करन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्याथ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्याथ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

easymag