केज प्रतिनिधी: ग्रामीण भागातील सर्वात मोठी निवडणूक – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर
आज पोळा सणाच्या शुभमुहूर्तावर बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा अंतिम नकाशा जाहीर करण्यात आला. त्यामुळे बहुप्रतीक्षित निवडणुकीच्या प्रक्रियेला आता अधिकृत सुरुवात झाली आहे आणि राजकीय हालचालींना वेग मिळाला आहे.
विभागीय आयुक्तांनी गट व गणांवरील हरकतींची सुनावणी केल्यानंतर, बीड जिल्ह्यातील ६१ जिल्हा परिषद गट आणि ११ पंचायत समित्यांच्या एकूण १२२ जागांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली.
केज तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे बदल झाले आहेत. केजमध्ये ७ जिल्हा परिषद गटांसाठी आणि १४ पंचायत समिती गण निश्चित करण्यात आले. आडस, युसुफ वडगाव गटांमध्ये काही बदल झाले असून, युसुफ वडगाव गटातून भाटूंबा आणि सावळेश्वर गावांना वगळून ढाकेफळ गावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे गणित बदलणार असल्याची शक्यता आहे.
या नव्या प्रभाग रचनेमुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक गती येणार असून, उमेदवार व मतदारांना आता स्पष्ट माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रचार आणि पक्षीय बैठका, लॉबिंग, उमेदवार निवड प्रक्रिया आदी गोष्टींना आता वेग येणार आहे
विशेष म्हणजे, आज पोळा सण असल्याने अनेक गट) यांच्यात संभाव्य उमेदवारांची चढाओढ सुरू झाली आहे.
तथापि, खरी स्पर्धा आरक्षण सोडतीनंतरच सुरू होईल, त्यामुळे सर्वांचे लक्ष आता आरक्षणाच्या घोषणेकडे लागले आहेइच्छुकांनी या शुभदिनी संपर्क मोहीमेला सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार व शरद पवार गट), शिवसेना (शिंदे व ठाकरे .
टिप्पणी पोस्ट करा