#EWS व LIG गटासाठी सुवर्णसंधी - मोफत वाळू वितरणाचा लाभ घ्या
विषय: घरकुलासाठी ०५ ब्रास वाळू मोफत निर्गतीचे धोरण – अंमलबजावणी बाबत.
संदर्भ:
- मा. जिल्हाधिकारी बीड यांचे आदेश क्र. 2025/मशाका/गो.ख/वाल्लु/कावि-023/2025, दिनांक 23.04.2025
- मा. जिल्हाधिकारी बीड यांचे पत्र क्र. 2025/मशाका/गौ.ख./कावि, दिनांक 21.05.2025
- मा. जिल्हाधिकारी बीड यांची व्हिडिओ कॉन्फरन्स, दिनांक 14.08.2025
सदर विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, शासन निर्णय दिनांक 08.04.2025 व दिनांक 30.04.2025 नुसार "वाळू निर्गती धोरण - 2025" अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गटातील (LIG) पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच, गटविकास अधिकारी, केज यांच्याकडून या तालुक्यातील विविध योजनांतील पात्र लाभार्थ्यांची यादी या कार्यालयास प्राप्त झाली आहे.
उक्त शासन निर्णयांनुसार, प्रत्येक पात्र घरकुल लाभार्थ्यास कमाल 05 ब्रास वाळू ही स्वामित्व शुल्क न आकारता मोफत वितरित करण्यात येणार आहे. वाळू वितरणासाठी खालील नदीपात्रांमधून वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे:
- मौजे लाखा
- मांगवडगाव
- दैठणा
- बोरगाव बु.
- नाव्होली
सूचना लाभार्थ्यांसाठी:
आपण पात्र लाभार्थी असल्यामुळे, आपल्या घरकुलाच्या बांधकामासाठी वरीलपैकी सोयीच्या ठिकाणाहून 05 ब्रास वाळू मोफत घेण्यासाठी दिनांक 01.10.2025 नंतर आपल्या वाहनासह, खालील कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी हजर राहावे:
- आधार कार्ड
- आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल नंबर
वाळू वाहतुकीसाठी ऑनलाइन पास मंडळ अधिकारी / ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत तयार करून घ्यावा.
गटविकास अधिकारी
पंचायत समिती, केज
तहसीलदार
केज
प्रत पाठविणे:
- मा. जिल्हाधिकारी, बीड – माहितीस्तव
- मा. अपर जिल्हाधिकारी, अंबाजोगाई – माहितीस्तव
- मा. उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई – माहितीस्तव
- गटविकास अधिकारी, केज – माहितीस्तव व आवश्यक कार्यवाहीसाठी
- मंडळ अधिकारी, ह. पिंत्री व ग्राम महसूल अधिकारी, सज्जा – माहिती व कार्यवाहीसाठी
सूचना: उपरोक्त नियमानुसार वाळू वितरीत करून त्याची नोंद व अभिलेख संबंधित अधिकारी यांनी तयार ठेवून तहसील कार्यालयास सादर करावी. यासोबतच वेळोवेळी अहवाल सादर करावा.
टिप्पणी पोस्ट करा