केली आहे सुरूवात
खडतर आहे प्रवास,
मनात आहे विश्वास
खंबीर आहे साथ,
नाही कोणाशी स्पर्धा
स्वतःशीच लढतोय आज
हो मी केली आहे सुरूवात .
भेटतील खूप वादळे
येतील चढ - उतार ,
माघार घेणे मला मान्य नाही
चालत आहे रोज थोडा ,
आत्ता ते शिखर दूर नाही
हो मी केली आहे सुरूवात ...
टिप्पणी पोस्ट करा