ऊसतोड कामगार हा समाजातील स्वाभिमानी घटक आहे, त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, हेच आमचं ध्येय आहे. त्यांना शिक्षण, आरोग्य, सन्मान व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील आहोत. कष्टकरी कामगारांच्या मुला-मुलींसाठी आम्ही रोजगाराची दारे खुली करत आहोत. बीडकरांसाठी नवनवीन सुविधा आम्ही घेऊन येत आहोत. बीड ते मुंबई रेल्वे मार्ग लवकरच सुरू होईल. आपलं हक्काचं महायुतीचं हे सरकार बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी चांगले कर्तृत्ववान अधिकारी आम्ही उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी कुठेही आम्ही कमी पडू देणार नाही. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारलेला समाज घडवण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत असे अजित पवारांनी बीड येथे म्हटलं आहे.
नव नवीन योजना तसेच सरकारी योजना ताज्या घडामोडी पहाण्यासाठी येथे क्लिक करा जॉईन करा 👇
टिप्पणी पोस्ट करा