केज तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी तहसील कार्यालय, केज येथे सर्व विभागप्रमुख अधिकाऱ्यांची नैसर्गिक आपत्ती आढावा बैठक आयोजित करण्यात आली.
या बैठकीला आमदार सौ.नमिताताई मुंदडा यांनी उपस्थित राहत संबोधित केले.
या बैठकीत तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये झालेल्या अतिवृष्टीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले सरसकट नुकसान, घरांचे नुकसान, पुराच्या पाण्यामुळे बाधित झालेली रस्ते व पूल, बंधारे तसेच दगावलेली जनावरे याबाबत सखोल आढावा घेण्यात आला. पिकांचे पंचनामे, घरांचे पंचनामे तसेच इतर नुकसानग्रस्त घटकांचे पंचनामे तातडीने करून नोंद करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे जनावरे दगावली असून काहींच्या घरांचे नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकरी व नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात मदत म्हणून धनादेशाचे वाटप यानिमित्ताने करण्यात आले.
या बैठकीस उपजिल्हाधिकारी श्री. दीपक वजाळे साहेब, तहसीलदार श्री. गिड्डे साहेब, आदरणीय नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) तसेच सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व जणांनी काळजी घ्यावी.
टिप्पणी पोस्ट करा